फेसबुकवर 20कोटी बनावट अकाऊंट्स

फेसबुकवर 20कोटी बनावट अकाऊंट्स

हैदराबाद - फेसबुकने नुकत्याच केलेल्या पाहणीत समोर आलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर जगभरात 20कोटी बनावट अकाऊंट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातील बहुतांश खाती भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारख्या विकसनशील देशांमधील असल्याचे समोर आले आहे.  

गेल्या काही वर्षांत फेसबुकसारख्या सोशल मिडियाचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला. 31 डिसेंबर 2016ला केलेल्या पाहणीत फेसबुकचे 1.86अब्ज एवढे मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स होते. त्यापैकी सहा टक्के, म्हणजे 114 दशलक्ष खाती बनावट असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, वर्षभरात एकूण वापरकर्ते आणि बनावट खात्यांमध्येही मोठी वाढ झाली असून, 31 डिसेंबर 2017पर्यंत ही संख्या 2.13 अब्ज एवढी झाली. यापैकी 10 टक्के खाती बनावट असल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षांत मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्सबरोबरच डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सही वाढल्याचे या पाहणीत समोर आले आहे. जगात 2016मध्ये फेसबुकचे 1.23अब्ज डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्स होते. 2017मध्ये त्यात 14 टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या 1.40अब्ज एवढी झाली. 

फेसबुक सारख्या सोशल मिडियावर भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशा देशांतील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, विकसित देशांच्या नागरिकांच्या तुलनेने या देशातील नागरिकांची बनावट खाती चालवण्याची प्रवृत्तीही अधिक असल्याचे फेसबुकच्या पाहणीत म्हटले आहे. 

फेसबुकवरील बनावट खात्यांचे प्रकार 

  • डुप्लिकेट अकाऊंट्स - एखाद्या वापरकर्त्यांने त्याच्या मुख्य अधिकृत खात्याशिवाय काढलेले आणि चालवलेले दुसरे खाते. 
  • फॉल्स अकाऊंट्स - युजर-मिसक्लासिफाइड अकाऊंट. त्यात वापरकर्त्यांनी व्यवसाय, संस्था, आस्थापना आदी गोष्टींसाठी खाती उघडलेली असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com