मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत - फडणवीस

सरकारनामा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

कोल्हापूर : मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, असे म्हणत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाजप-सेना युती शासनाच्या काळात जे निर्णय झाले ते कॅबिनेटमध्ये झाले, सेना-भाजपाने ते एकत्रित घेतले होते, त्यामुळे अशा निर्णयातून होत असलेल्या कामांना स्थगिती देण्यात काहीच अर्थ नाही, म्हणूनच मी पाहिलेले उद्धव राहिलेले नाहीत, असे श्री. फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, "सत्तेत येण्यापुर्वी श्री. ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रूपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण प्रत्यक्षात काहीही मिळाले नाही. यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला गेला आहे. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा या केवळ घोषणाच राहील्या आहेत. केवळ दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.``

ते म्हणाले,"सप्टेंबर 2019 ला असणारे थकित कर्ज माफ केले जाणार आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना होणार नाही असे मला वाटते. कारण, आमच्या सरकारने यापुर्वीच हे कर्ज माफ केले आहे. अवकाळी पावसाने सुमारे 95 लाख हेक्‍टर्सवरील शेतीचे नुकसान झाले आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. माफ केलेले कर्ज मार्च 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात दिले जाणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता तातडीची गरज असताना सरकारने ती केलेली नाही. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे काहीच हाती लागले नाही. ज्या शेतकऱ्यांना खरी मदतीची गरज आहे त्यांना सरकारने काहीच मदत केलेली नाही.'

नागरीकत्त्व विधेयकाबाबत बोलताना श्री. फडणवीस म्हणाले,"भारताचे नागरिकत्त्व देणारा हा कायदा आहे, नागरीकत्त्व काढून घेणारा हा कायदा नाही. फाळणीनंतर अल्पसंख्याकांचे सरक्षण करणे हे भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश यांचे कर्तव्य होते. पण अल्पसंख्याकांची सुरक्षा पाकिस्ता व बांग्लादेशने केली नाही. हा कायदा अल्पसंख्यकांचे सरंक्षण करणारा कायदा आहे. हा कायदा कोणत्याही धर्माविरोधात नाही.'

Web Title - Fadanvis criticism on uddhav thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live