'गिरीश, मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयातच उपचार कर' - फडणवीस

साम टीव्ही
गुरुवार, 16 जुलै 2020
  • 'गिरीश, मला कोरोना झाल्यास...
  • ...सरकारी रुग्णालयातच उपचार कर'
  • देवेंद्र फडणवीसांचे भावूक उद्गार
  • भाजप नेते गिरीश महाजनांची माहिती

ऱाज्याच्या आरोग्य यंत्रणेवर विरोधी पक्षाने सवाल उपस्थित केलेत. अशातच गरीबांना कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल केलं जातंय. त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशातच पुढारी मात्र मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यावरुन विरोधी पक्षाने सवाल उपस्थित केलेत.

सरकारी रुग्णलयांवर पुढाऱ्यांचा विश्वास नाही का, असा प्रश्न विचारला जातोय. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीष महाजनांकडे भावूक उद्गार काढलेत. मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयातच उपचार करावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजनांकडे बोलून दाखवलंय. गिरीष महाजनांनी ही माहिती दिली आहे. एकीकडे सामान्यांना वेळेवर उपचार मिळत नसताना राज्यातील मंत्री मात्र खासगी रुग्णालयांत जात असल्याचं दिसून आलंय. त्यावरुन प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.

त्यातच राज्यात 7 हजार 975 कोरोना रूग्णांची नोंद झालीय. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 640 वर पोहोचलीय. तर राज्यात गेल्या 24 तासांत 233 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्यूदर 3.96 टक्के इतका आहे. दिवसभरात 3 हजार 606 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 11 हजार 801 रूग्ण ऍक्टीव्ह रूग्ण आहेत. तर सध्या 7 लाख 30 हजार लोक होम क्वारंटाईन आहेत. 

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रशासनही हबकत चाललंय. पुढे काय होणार हाच मोठा प्रश्न आता पडलाय. त्यात आता राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसतंय. विरोधीपक्ष नेते फडणवीस महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे सरकारला कामांबाबत तत्परता आणणं गरजेचं आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता रुग्णालय आणि रुग्णांचे हालच जास्त पहायला मिळताय.


संबंधित बातम्या

Saam TV Live