फडणवीसांची शरद पवारांवर टीका

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

 

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यानंतर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसतायत. आता त्यांनी चक्क शरद पवारांनाच टार्गेट केलंय. त्यांनी शरद पवार पुरोगामी असल्याचं म्हटलंय. 

काय म्हणाले फडणवीस?

 

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यानंतर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसतायत. आता त्यांनी चक्क शरद पवारांनाच टार्गेट केलंय. त्यांनी शरद पवार पुरोगामी असल्याचं म्हटलंय. 

काय म्हणाले फडणवीस?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.  शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. 'मी ब्राह्मण आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण दर वेळी काही ना काही निमित्ताने ते माझी जात बाहेर काढत असतात', अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अजित पवारांशी भाजपने केलेली हातमिळवणी किंवा पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली चर्चा यात पडद्यामागे आणि `बिटविन द लाइन` बरेच काही आहे. ते योग्य वेळी बाहेर काढेन, असा इशाराही त्यांनी दिला. 

Web Title -  Fadnavis criticizes on  Sharad Pawar 


संबंधित बातम्या

Saam TV Live