VIDEO | वांद्रे प्रकरणावरुन फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

साम टीव्ही
बुधवार, 15 एप्रिल 2020

विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी वांद्र्यातील गर्दीवर सरकारवर टीका केलीय. बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणं, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे.

विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी वांद्र्यातील गर्दीवर सरकारवर टीका केलीय. बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणं, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणं, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. असं फडणवीसांनी म्हंटलय.

 

पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले-

दरम्यान, मंगळवारी सगळ्यात मोठी आणि दुर्देवी घटना घडली ती वांद्रे स्थानकात. दुपारी 4च्या सुमारात तब्बल 800 ते १ हजार जण एकत्र वांद्रे स्थानकात आल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले. दरम्यान, गर्दीचं आवाहन केल्याचा ठपका ठेवत विनय दुबे याला नवी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विनय दुबेने गर्दी फेसबूक लाईव्हच्या  माध्यमातून एक मोहिम राबवली होती. महाराष्ट्रात अडकलेल्या कामागारांनी घरी सोडण्यासाठी राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळेत गर्दी झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विनय दुबे याचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क असून तो उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे...  दरम्यान ज्या पत्रकातून ही अफवा पसरली. ते पत्रकही साम टीव्हीच्या हाती लागलंय. नवी मुंबई पोलिसांनी ऐरोलीतून विनय दुबेला ताब्यात घेतलंय. 

संपूर्ण देशात ३ मेपर्यंत सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत, असं रेल्वेने मंगळवारी रात्री पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. नागरिकांनी गर्दी करू नये. कुठलीही विशेष ट्रेन धावणार नाहीए. रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिलीय. तसंच अफवा पसरवू नये असं आवाहनही केलंय. लॉकडाऊन वाढवल्याने १५ एप्रिल ते ३ मेपर्यंतची सर्व तिकीटं रेल्वेला रद्द करावी लागणार आहेत. जवळपास ३९ लाख तिकीटं रद्द करावी लागतील. २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार असल्याने १५ तारखेपासून रेल्वे सेवा सुरू होतील या अपेक्षेने रेल्वेने तिकीटांचे बुकींग सुरू केले होते. यामुळे ३९ लाख तिकीटांचे बुकींग झाले होते. देशातील १५ हजार रेल्वेतून दररोज जवळपास २ कोटी नागरिक प्रवास करतात.

WEB TITLE - marathi news Fadnavis criticizes the state government over the Bandra matter


संबंधित बातम्या

Saam TV Live