हिंगोलीमध्ये बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही राजरोजपणे हॉस्पिटल चालवून लोकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या डॉक्टरवर कारवाई.

हिंगोलीमध्ये सामाजिक कार्यकर्त्याच्या निनावी तक्रारीने आणि त्यासोबत दिलेल्या सीडीमुळे बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश झालाय. कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही उघडपणे हॉस्पिटल चालवून, लोकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या डॉक्टरची माहिती समजताच हिंगोलीचे आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी या बंगाली डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश दिलेत. औंढा तालुक्यातल्या शेंदूर सेना गावाजवळ एका शेतामध्ये हा बंगाली डॉक्टर आपला अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय थाटून बसला होता. या भागामधील काही राजकीय लोकांचे पाठबळ असल्याने त्याच्या विरोधात कुणीही तक्रार देत नव्हतं. 

WebTitle : marathi news fake doctor arrested from hingoli maharashtra 


संबंधित बातम्या

Saam TV Live