मुंबई विद्यापीठात बोगस मार्कशिट्सचा बाजार ; १ लाख ३५ हजारांत बोगस मार्कलिस्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

तुम्हाला इंजिनिअरिंगची किंवा बीकॉम बीएची डिग्री मिळवायचीय? टेन्शन घेऊ नका. 

खिशात लाख सव्वालाख रुपये असले तर तुम्हाला हवी ती मार्कशिट्स बनवण्याची व्यवस्था मुंबई विद्यापीठात झालीय. बोगस मार्कशिट्स बनवून देणाऱ्या मुंबई विद्यापीठातल्या टोळीचा रत्नागिरी पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

रत्नागिरीच्या फिनोलेक्स इंजिनिअरिग कॉलेजच्या विद्यार्थ्यानं बोगस मार्कशिट्सच्या आधारे प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला.

पण, कॉलेजच्या प्रसंगावधानतेमुळं तो उधळला गेला.
या टोळीत मुंबई विद्यापीठातला शिपाई, टाडा एंट्री ऑपरेटर आणि परीक्षा विभागातल्या एका क्लर्कचा सहभाग आहे. पोलिसांनी मार्कशिट् बनवणाऱ्या विद्यार्थ्यासह सहा जणांना अटक केलीय.

सुरेश कदम, पोलिस निरीक्षक, रत्नागिरी (सहा जणांची टोळी जेरबंद केलीय. त्यात विद्यापीठातले कर्मचारीही आहेत.

परीक्षांच्या निकालांच्या घोळामुळं विद्यापीठाची प्रतिष्ठा धुळीला मिळालीय. त्यातच आता बोगस मार्कशिट्स बनवणारी टोळी उघडकीस आल्यानं विद्यापीठाच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगल्यासारखं झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live