कोरोना मृत्यूपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त

साम टीव्ही
शनिवार, 11 जुलै 2020

ग्रामीण भागात कोरोना मृत्यूपेक्षा शेतकरी आत्महत्या जास्त झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. तब्बल  1 हजार 860 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. कर्जबाजारीपणामुळे राज्यातील बेहाल शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये.

ग्रामीण भागात कोरोना मृत्यूपेक्षा शेतकरी आत्महत्या जास्त झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. तब्बल  1 हजार 860 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. कर्जबाजारीपणामुळे राज्यातील बेहाल शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये.

गेल्या 4 महिन्यांत विदर्भ, मराठवाड्यात 780 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मार्च ते जून अखेरपर्यंतची ही आकडेवारी समोर आली आहे.  राज्यात आतापर्यंत ९,८९३ कोरोना मृत्यू झाले असून ८,७९५ मृत्यू हे मुंबई महानगर प्रदेश, पुणे आणि इतर शहरी भागातील आहेत. त्यामुळे उर्वरित ११०० कोरोना मृत्यू हे राज्यातील ग्रामीण भागात झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या या ग्रामीण भागातील कोरोना मृत्यूपेक्षा ६० टक्क्यांहून अधिक असून ही बाब अंगावर काटा आणणारी आहे.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलंय. या विषाणूने आतापर्यंत 5 लाख 62 हजार 585 नागरिकांचा बळी घेतला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी  26 लाखांवर पोहोचली असून आतापर्यंत 73 लाख 20 हजार रुग्ण बरे झालेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश या विषाणूविरोधात लढत आहेत. दरम्यान या विषाणूला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय.

तर, जगात महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत कोरोनाने हाहाकार केलाय. अमेरिकेत मृतांचा आकडा 1 लाख 36 हजारवर पोहोचलाय. तर सध्या अमेरिकत  32 लाख 91 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित  आहेत..एका दिवसात अमेरिकेत तब्बल 71 हजार नवीन रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत  70 हजाराहून अधिक जणांचा  कोरोनामुळं मृत्यू झालाय. तर 18 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय. ब्राझीलमध्ये काल एका दिवसात 45 हजार नवीन रुग्णांची नोंद झालीय. दररोज इथल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयात खाटा कमी पडायला लागल्या आहेत. यामुळे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live