फनी चक्रीवादळाचा ओडिशाला तडाखा; घरांची पडझड, मोठं मोठी झाडं उन्मळून पडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, ओडिशा
शुक्रवार, 3 मे 2019

फनी' म्हणजे काय?

फनी चक्रीवादळाचं नाव बांग्लादेश कडून सुचवण्यात आलंय. फनीचा उच्चार फोनी असा केला जातो. फनीचा बांगलादेशमध्ये अर्थ साप होतो. साधरण २००० सालापासून उष्णकटिबंधीय वादळांना नाव देण्याची पद्धत आहे. चक्रीवादळाचा धोका ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. प्रत्येक देशाकडून 8 नावं सुचवली जातात. 

उन्मळून पडलेली मोठं मोठी झाडं, घरांची पडझड, ठिकठिकाणी पडलेले विजेचं खांब, ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या फनी चक्रीवादळानं असा विध्वंस केलाय. ताशी १८५ किमी वेगानं फनी चक्रीवादळ धडकलं मात्र काही वेळात रौद्र रुप धारण करत त्यानं २४० प्रति किमी इतका वेग पकडला. ओडिशात पाच ते सहा तास फनी चक्रीवादळानं अक्षरशा धुमाकूळ घातलाय.

 

  • वादळाचा सर्वाधिक मोठा फटका ओडिशातील १३ जिल्ह्यांना बसला असून या जिल्ह्यातील  साडे अकरा लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.
  • मागील दोन दिवसांत सुमारे ९५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यात. 
  • फनीचा फटका हवाई वाहतुकीलाही बसलाय.
  • कोलकात्ता विमानतळ बंद ठेवण्यात आलंय. 
  • अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा खंडीत झालाय.

 

 

मदत आणि बचावासाठी एनडीआरएफची ८१ पथके तैनात करण्यात आलीत. ओडिशानंतर फनी चक्रीवादळ बंगालमध्ये धडकडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कोणत्याही आपत्तीचा सामना कऱण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलीय.

फनी हे १९९९च्या सुपर चक्रीवादळानंतरचे सर्वांत महाप्रलयकारी वादळ आहेत. आशा करुयात की  किनारपट्टीवर या चक्रीवादळामुळं कमीत कमी नुकसान होईल.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live