...म्हणून त्या शेतकरी दांम्पत्याने केली आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

कर्जमाफी यादीत नाव असूनही कर्ज न मिळाल्यानं शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे. 

रमेश सावळे आणि विद्या सावळे यांनी घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीये. बुलडाण्यातील मोताळा येथील सावळे या शेतकरी दांपत्यावर बँकेचं कर्ज होतं. मात्र ही बाब सातत्त्यानं त्यांना सतावत होती.

सरकारनं कर्ज माफी केली मात्र त्याचा लाभ मिळत नसल्यानं या दोघांनी विहिरित उड़ी घेऊन आत्महत्या केलीय. सावळे कुटुंबाकडे तीन एकर शेती असून त्यांच्या पश्चात तीन वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे मोताळा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live