(VIDEO) 370 किलो टोमॅटो विकले; खर्चवजा करून 1 रुपयाचा फायदा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

संतोष जगताप या शेतकऱ्यानं 17 क्रेट म्हणजे तब्बल 370 किलो टोमॅटो विकल्यानंतर त्याला खर्चवजा करून अवघा एक 1 रुपयाचा फायदा झालाय.

देशातील शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न देण्य़ाचं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची काय दुरावस्था आहे हे सांगायला ही बातमी पुरेशी आहे. संतोष जगताप या शेतकऱ्यानं 17 क्रेट म्हणजे तब्बल 370 किलो टोमॅटो विकल्यानंतर त्याला खर्चवजा करून अवघा एक 1 रुपयाचा फायदा झालाय.

हा प्रकार म्हणजे अहोरात्र घाम गाळून तुमच्या-आमच्या तोंडात घास भरविणाऱ्या बळीराजाची अतिशय क्रूर थट्टाच म्हणावी लागेल.

जगताप यांनी चांगला भाव मिळण्याच्या आशेवर 17 क्रेट टोमॅटो मुंबईत विक्रीसाठी पाठवले होते. 3 रुपये 60 पैसे प्रतिकिलो दराने त्यापोटी अवघी 1,332 रुपये विक्री रक्कम झाली. त्यातून हमाली, तोलाई, टपाल आणि बारदानखर्च, गाडीभाडे असा एकूण खर्च 1,331 रुपये इतका झाला. हे सारे खर्च वजा जाता फक्त 1 रुपया जगताप यांच्या हातावर टेकवण्यात आलाय. 

WebTitle :  marathi news farmer gets 1 rupee profit after sale of 370 kg tomato 


संबंधित बातम्या

Saam TV Live