VIDEO | थक्क करणारा असा शेतकऱ्याचा निवृत्ती सोहळा

अभिजीत घोरमारे
रविवार, 22 डिसेंबर 2019

आजपर्यंत आपण खासगी किंवा सरकारी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवृत्ती सोहळा बघितला असेल. पण आता आम्ही तुम्हाला असा निवृत्ती सोहळा दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. पाहुयात हे खास विश्लेषण...

आजपर्यंत आपण खासगी किंवा सरकारी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवृत्ती सोहळा बघितला असेल. पण आता आम्ही तुम्हाला असा निवृत्ती सोहळा दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. पाहुयात हे खास विश्लेषण...

वाजणारे हे ढोल ताशे. आनंदानं नाचणारी मुलं. बैल बंडीनं जाणारी लोकं. ही सगळी दृश्य पाहून एखादी मिरवणूक चालली असल्याचं तुम्हाला वाटेल पण ही मिरवणूक नाही. हा आहे एका शेतकऱ्याच्या सेवानिवृत्तीचा सोहळा. हो तुम्ही योग्य ऐकलंत, शेतकऱ्याचा निवृत्ती समारंभ. आजवर तुम्ही खासगी किंवा सरकारी नोकरीत असणाऱ्यांचा सेवानिवृत्ती सोहळा झाल्याचं ऐकलं असेल पण भंडाऱ्यात चक्क शेतकऱ्याचा निवृत्तीसोहळा पार पडला.

मोहोडी तालुक्यात मोहगाव इथं हा अनोखा सोहळा पार पडला. आणि या सोहळ्याचे मानकरी होते ते ८० वर्षीय गजानन काळे. ६० वर्षांपासून काळे शेती करतात. सरकारी कर्मचाऱ्यांचा सोहळा होतो मग शेतकऱ्याचा निवृत्ती सोहळा का नको याच कल्पनेतून काळे यांच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी हा सोहळा करण्याचं ठरवलं.

मुलांसह नातेवाईकांनी केलेल्या या सोहळ्यामुळे, मान-सन्मानानं ८० वर्षीय गजानन काळेंच्या डोळ्यात पाणी आलं. वृद्ध आईवडलांना घरातील अडगळ म्हणून पाहण्याची विकृती समाजात बळावतीय. मात्र याच काळात आयुष्यभर शेतात राबलेल्या, कुटुंबासाठी काळ्या मातीत घाम-रक्त गाळलेल्या आपल्या वडलांना मुलांनी निवृत्ती सोहळ्याद्वारे पोचपावती दिली. नव्या पिढीनं यातनं आदर्श घेतला पाहिजे.


संबंधित बातम्या

Saam TV Live