देशात 58 हजार कोटींचा कृषिकर्ज घोटाळा... 615 उद्योगपतींनी उचललं कृषिकर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

पाच पंचवीस हजारांच्या कर्जासाठी शेतकरी बँकांचे खेटे घालताना दिसतात. पण याच शेतकऱ्यांच्या नावावर देशातल्या उद्योगपतींनी स्वतःचं उखळ पांढरं केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

2016मध्ये 615 उद्योगपतींनी तब्बल 58 हजार 561 कोटींचं कृषीकर्ज घेतलं. बड्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याचं माहिती अधिकारात स्पष्ट झालाय. या कृषीकर्ज घोटाळ्याच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केलीय.

कृषी कर्जाच्या नावाखाली स्वस्तात कर्ज उचलून बड्या कंपन्या आणखी मालामाल झाल्या. शेतकऱ्यांचा मात्र काही हजारांच्या कर्जासाठी फुटबॉल होतो असं खेदानं म्हणावं लागेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live