आता शेतकऱ्यांची गुरे करणार उपोषण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

प्रशासनाने शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर 7 सप्टेंबरपासून गुराचेही उपोषण सुरू होणार, असे निवेदन उपोषण करणाऱ्या शेतकऱयांनी 6 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना दिले आहे.

राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जमाफी आणि कर्ज वाटपासंदर्भात तालुक्यात शेतकऱयांना वेठीस धरले जात आहे. यामध्ये बरेच शेतकरी वैतागले आहेत. म्हणून 13 शेतकऱयांनी बँका समोर संग्रामपुरात 4 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

तीन दिवस होऊनही प्रशासन दखल घेण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. म्हणून संतप्त होऊन 7 सप्टेंबर पासून बँकांचे समोरील शेतात आणि गोठ्यात, वाड्यावर गुरांचे उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live