गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात गुन्हेगारांसारख्या पाट्या देऊन पंचनामे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू केलीय. आता गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करताना त्यांचे आरोपीसारखे फोटो काढले गेलेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरूम, चिंचोली, एकोंडी भागात तलाठ्यांनी हे सुलतानी पंचनामे केले. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्या शेतकऱ्यांना शेतात उभं करून त्यांच्या हातात पाट्या देण्यात आल्या. त्या पाट्यांवर शेतकऱ्याचं नाव आणि कोणत्या पिकाचं नुकसान झालं ते लिहण्यात आलं. ऍग्रोवन या वृत्तपत्रानं या सुलतानी पंचनाम्यांना वाचा फोडली. शेतकऱ्यांमध्येही या प्रकाराबाबत संतापाची लाट आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू केलीय. आता गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करताना त्यांचे आरोपीसारखे फोटो काढले गेलेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरूम, चिंचोली, एकोंडी भागात तलाठ्यांनी हे सुलतानी पंचनामे केले. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्या शेतकऱ्यांना शेतात उभं करून त्यांच्या हातात पाट्या देण्यात आल्या. त्या पाट्यांवर शेतकऱ्याचं नाव आणि कोणत्या पिकाचं नुकसान झालं ते लिहण्यात आलं. ऍग्रोवन या वृत्तपत्रानं या सुलतानी पंचनाम्यांना वाचा फोडली. शेतकऱ्यांमध्येही या प्रकाराबाबत संतापाची लाट आहे. मदत नको पण असे सुलतानी पंचनामे करू नका अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.  
 


संबंधित बातम्या

Saam TV Live