कर्जमाफीनंतरही बँकांकडून व्याजवसुली ! सरकारी आदेशांना बँकाकडून केराची टोपली

कर्जमाफीनंतरही बँकांकडून व्याजवसुली ! सरकारी आदेशांना बँकाकडून केराची टोपली

बीड : राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांचे दशावतार संपलेले नाहीत. कर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली सुरु आहे. सरकारकडून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या उशीरानं मिळत असल्यामुळं बँका शेतकऱ्यांकडून वसूल करत आहेत. 

बीड जिल्ह्यातील बेलुरा गावाचे गोरख गवते यांनी तीन वर्षांपूर्वी  इंडिया बँकेचं २५ हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. गोरख गवते याच्या मालकीची दोन एकर शेती आहे. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पनातून त्यांना कर्ज फेडणं शक्य होतं नव्हतं.. कर्ज कसं फेडावं या विवंचनेत असताना सरकारनं दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. मात्र ही कर्जमाफी दूर, गवतेकडून बँक आजही व्याज वसूल करत आहे. 

बँकांनी अशा प्रकारे  व्याजवसुली केलेले गोरख गवते एकमेव शेतकरी नाहीत....जिल्ह्यात अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडून बँका व्याज वसूली करत आहेत...यात राष्ट्रीयीकृत बँकांचाही समावेश आहे

  • ८ महिन्यांपूर्वी सरकारनं दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला..
  • राज्यात आतापर्यंत नऊ लाख ६१ हजार ३३० शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलीय..
  • कर्जमाफी पोटी तीन हजार ९७८ कोटी ९३ लाख रुपयांचे वितरण केलेत. 
  • सरकारनं कर्जमाफीसाठी १६ हजार ९५ कोटी रुपयांची तरतूद केलीय
  • विशेष म्हणजे यातील पाच हजार कोटी रुपये बँकांना दिलेत 

कर्जमाफीची आकडेवारी मोठी आहे. मात्र त्यातून शेतकऱ्याच्या म्हणावा तसा फायदा झालेला नाही. आता तरी कर्जमुक्ती फक्त कागदावरच असल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. 

WebTitle : marathi news farmers loan wavier banks still taking interest from farmers

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com