कर्जमाफीच्या घोषणेची वर्षपूर्ती; शेतकऱ्यांना मिळालाय का दिलासा ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेला आज वर्ष पूर्ण झालंय. दरम्यान सहाकर आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी 47 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 हजार कोटी जमा केले असल्याची माहिती दिलीये. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 77 लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले असून आतापर्यंत 47 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 हजार कोटी वर्ग झाले असल्याची माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

दीड लाखांच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना  एकरकमी भरण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत आहे. अशा  8 लाख शेतकऱ्यांना आणि 2001 पासून थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी  पुन्हा मुदतवाढीची मुख्यमंत्र्याकडे मागणी केल्याचेही सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.याशिवाय

योजनेच्या अंमलबजावणीला उशीर होत नसून मिसममॅच  झालेला एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचा दावाही त्यांनी  केलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live