बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचा पांडुरंग फुंडकरांच्या बंगल्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

वाशिम इथल्या तब्बल 18 बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. वाशीम येथील तब्बल 50 बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादन आणि वितरण अनुदान मिळावं या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी सामुहिक आत्मदहनाचा इशाराही दिला होता. मात्र तरीही कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं या शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी फुंडकरांच्या बंगल्यासमोर विष प्राशन करुण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या सर्व शेतकऱ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय. दरम्यान यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.  

संबंधित बातम्या

Saam TV Live