कोरोनाच्या कठीण काळातही जगाचं पोट भरणारा शेतकरी मात्र हलाखीत...

साम टीव्ही
मंगळवार, 14 एप्रिल 2020

कोरोनामुळे जगाचं जनजीवन विस्कळीत झालेलं असताना जगाचा अन्नदाता मात्र हताश झालाय. घाम गाळून उभं केलेलं पीक रानातन नासून जातंय. म्हणूनच शेतकऱ्याला आधाराची गरजंय.

कोरोनानं जगभरातील प्रत्येकाला जेरीस आणलंय. व्यापारी घरात आहे, शिक्षक घरात आहे, उद्योजक आणि कामगारही घरात आहेत. कोरोनानं अख्खंच्या अख्खं जग घरात कोंडून ठेवलंय जणू...  पण, पण आपला शेतकरी मात्र राना-वावरात राबतोय. माती उपसतोय... घाम पेरतोय... अन् मोती पिकवतोय. मात्र ही पिकवलेला माती रानातच सडतेय. कारण कोरोनानं बाजारपेठांना कुलूप लावलंय...

लोकांना घरातून बाहेर पडता येत नाहीय त्यामुळे शेतकऱ्यानं काबाडकष्ट करून पिकवेला जिन्नस घेणार कोण? हा मोठा प्रश्न उभा राहिलाय. त्यातच राज्यातील प्रमुख बाजार समित्याही बंद केल्यात. त्यामुळे शेतकरी आभाळाएवढ्या संकटाखाली दबून गेलाय.

जगातल्या पहिल्या व्यक्तीपासून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाची मुलभूत गरज अन्न हीच आहे. आणि अन्न हे केवळ आणि केवळ शेतीच देऊ शकते. म्हणून शेती टिकली पाहिजे. आणि त्यासाठी शेतकरी जगला पाहिजे. कारण, कोरोनाविरोधात सध्या सुरू असलेल्या या महायुद्धात डॉक्टर दवाखान्यात. पोलिस आणि पत्रकार रस्त्यावर लढतायत. या सगळ्यांचं पोट भरणारा शेतकरी या सर्वांइतकाच महत्त्वाचा सैनिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं हे चक्रव्युह भेदून, धन-धान्य देणाऱ्या अन्नदात्याला आधार द्यायला हवा. त्याच्या खांद्यांना बळ द्यायला हवं.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live