राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पहिली मदत जाहीर; केंद्राकडून जाहीर होणाऱ्या पॅकेजबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पहिली मदत जाहीर कऱण्यात आलीय 151 दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटींची मदत मिळणार आहे. जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. या मदतीचे सर्व पैसे बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. या पैशातून बँकांना कोणतीही वसुली करता येणार नाही.

तर दुसरीकडे आज शेतकऱ्यांनी विशेष पॅकेजची घोषणा होणार असल्याची चर्चा होती. केंद्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही याबाबत चर्चा होणार होती. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्यानं आता शेतकऱ्यांना विशेष पॅकेजची घोषणा केव्हा होते, हे पाहणं महत्त्वाचंय. 

सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर होणार असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्पन्नातील तुटीमुळे छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना येणारे नैराश्य याविषयी प्राधान्याने बैठकीत विचार होणार आहे. तसंच कृषी मंत्रालयाच्या प्रस्तावाचाही विचार केला जाणार आहे.

WebTitle : marathi news farmers relief package might be announced today 

संबंधित बातम्या

Saam TV Live