शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध; बेळगावमध्ये बायपास रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी पाडलं बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे - बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते चार ए जोडण्यासाठी बायपास रस्त्याचा घाट घालण्यात आला आहे  मात्र या बायपास रस्त्यामुळे वडगाव, अनगोळ, शहापूर, हलगा शिवारासह इतर भागातील एक हजारहुन अधिक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन या रस्त्यात जाणार आहे. यासाठी या मार्गास शेतकऱ्यांचा विरोध आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी  मजगांव शिवारात जाऊन काम बंद पाडले. तसेच रस्ता करण्यासाठी आणलेले जेसीबी, ट्रक व रोलरसह कर्मचाऱ्यांना तेथून पिटाळून लावले. यावेळी शेतकरी व कर्मचारी यांच्यात वादावादी झाली, मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा काम सुरू केल्यास हिसका दाखविण्याचा इशारा दिला. 

Web Title: work of Bypass road in Belgaum was stopped by the farmers

संबंधित बातम्या

Saam TV Live