दहा जूनपर्यंत सुरु राहणार १२८ शहरातील शेतकऱ्यांचा संप

दहा जूनपर्यंत सुरु राहणार १२८ शहरातील शेतकऱ्यांचा संप

पुणे: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रयत्न आंदोलकडून सुरू आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानातही शेतकरी संपास प्रारंभ झाला असून येथे अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. देशातील १३० शेतकरी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रात काही शेतकरी संघटना यात सहभागी होणार नसून काहींनी आज धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोल्हापुरात भाजीपाला मार्केट ला साप्ताहिक सुट्टी असल्याने संपाचा परिणाम जाणवला नाही. कांदा बटाट्याची आवक नियमित झाली. दुधाचे टँकर ही नियमितपणे रवाना झाल्याची माहिती दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिली. 

पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर मार्गावर दूध टॅंकर शेतकरी आंदोलनकांनी अडवला. दूध रस्त्यावर ओतले. नाशिक जिल्ह्यातील सायखेड्यात दूधाचा टॅंकर अडविण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. विदर्भात पहिल्या दिवशी व्यहवार सुरळीत सुरू होते. नागपूर बाजारसमिती सौदे नियमितपणे सुरू होते.

औरंगाबाद -कन्नड मार्गावर गल्ले बोरगाव येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध सांडून केला शासनाच्या धोरणाचा निषेध केले. औरंगाबाद येथे शेतकरी संपानिमित्ताने सकाळी 11 वाजता स्थानिक क्रांती चौकात क्रांती मशाल पेटविली जाणार आहे. लासुर स्टेशन परिसरातील पिंपळगाव येथे दूध वाटप होणार आहे.संपाची धार उद्या तीव्र होईल अशी माहिती विजय काकडे पाटील यांनी दिली. सांगली, सातारा, जळगाव, चाळीसगाव, परभणी बाजारसमित्यांमध्ये पहिल्या दिवशी तरी सर्व व्यवहर सुरळीत सुरू राहिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com