शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जून 2018

रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी संपाचा आजचा चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्य़ाचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. 5 जूनला शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरणार आहेत. तर 7 जूनपासून शहराकडे येणारा भाजीपाला, दूध रोखला जाईल.

10 जून रोजी राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी  राज्यासह देशभर आंदोलन पुकारलंय.

दरम्यान, शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक झाले असून जय जवान जय किसान संघटनेने रस्त्यावर दूध ओतून आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. किसान महासंघातर्फे विविध मागण्यांकरता देशव्यापी शेतकरी संपाची हाक देण्यात आली होती.

लवकरात लवकरच सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी गरिबांना मोफत दूधवाटपसुद्धा केलं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live