9 वर्षांच्या चिमुकलीवर सख्ख्या बापानेच केला बलात्कार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये 9 वर्षांच्या चिमुकलीवर सख्ख्या बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय... खामगाव तालुक्यातल्या सुटाला खुर्द गावात हा लज्जास्पद असा बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडलाय. 

मुलीची आई धुण्याभांड्याच्या कामासाठी गेलेली असताना सायंकाळी पीडित मुलगी शाळेतून घरी आली. मुलगी घरात एकटी असल्याचं लक्षात येताच दारुड्या बापाने तिच्यावर बलात्कार करुन तिला मारहाण केली.

मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिल संदीप महाजनला ताब्यात घेतलं असून मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live