पित्याने केले मुलीला सॅल्यूट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

हैदराबादचे पोलिस उपायुक्त ए. आर. उमामाहेश्वरा सर्मा यांची मुलगी भारतीय पोलिस सेवेत दाखल झाली. त्या सध्या पोलिस अधीक्षकपदावर कार्यरत आहेत. या पदावर असताना 'डीसीपी' असलेल्या तिच्या वडिलांनी 'एसपी' असलेल्या मुलीला 'सॅल्यूट' केला. या सॅल्यूटची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

उमामाहेश्वरा सर्मा हे गेल्या तीन दशकांपासून पोलिस सेवेत कार्यरत आहेत. सर्मा यांनी त्यांच्या मुलीला उत्तम शिक्षण देऊन पोलिस सेवेत दाखल होण्यास सांगितले. त्यानुसार तिने अत्यंत मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आणि भारतीय पोलिस सेवेत दाखल झाली. सिंधू सर्मा असे त्यांचे नाव.

तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात सिंधू सर्मा पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.कर्तव्य बजावत असताना या वडील आणि मुलीची भेट झाली. त्यावेळी उमामाहेश्वर यांनी वरिष्ठ अधिकारी असलेल्या आपल्या मुलीला सॅल्यूट केला.

याबाबत उमामाहेश्वरा यांनी सांगितले, की ''मी आणि वरिष्ठ अधिकारी असलेली माझी मुलगी तेलंगणा राष्ट्र समितीच्या एका कार्यक्रमात कर्तव्य बजावत होतो. तेव्हा माझी आणि माझ्या मुलीची भेट झाली. त्यादरम्यान, मी माझ्या मुलीला सॅल्यूट केला. तिला सॅल्यूट करताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे. आम्ही कर्तव्य बजावत असताना पहिल्यांदाच भेटलो होतो. मी तिच्यासोबत काम केल्याने अत्यंत भाग्यवान समजतो''.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live