'खूप कमी लोकांकडे असे धैर्य असते',प्रियांकांनी दिला राहुल गांधींना पाठींबा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष पदावरून पायउतार होणाऱ्या राहुल गांधी यांचे त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी कौतुक केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी 'खूप कमी लोकांकडे असे धैर्य असते', असे म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष पदावरून पायउतार होणाऱ्या राहुल गांधी यांचे त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी कौतुक केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी 'खूप कमी लोकांकडे असे धैर्य असते', असे म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात होती. राहुल गांधी यांनी २५ मे रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण कार्यकारिणीने एकमताने तो फेटाळला होता. यानंतरही राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांची मनधरणी करण्याचे विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. पण त्याला यश आले नाही. 

अखेर बुधवारी राहुल गांधी यांनी स्वतःहून आपल्या राजीनाम्याबद्दल वक्तव्य केले. कार्यकर्त्यांना त्यांनी एक चार पानी पत्र लिहून त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता काँग्रेस कार्यकारिणीने पुढील निर्णय घ्यायला हवा, असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ट्विटरवरील वैयक्तिक माहितीतून त्यांनी 'काँग्रेस अध्यक्ष' हे शब्दही काढून टाकले. केवळ 'खासदार' एवढीच माहिती त्यांनी ट्विटरवर ठेवली आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करून राहुल गांधी यांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मला नितांत आदर असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

Web Title: Few have the courage Priyanka Gandhi on Rahuls decision to step down


संबंधित बातम्या

Saam TV Live