रोनाल्डोची हॅट्ट्रिक; पोर्तुगाल-स्पेन ३-३ बरोबरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 जून 2018

सोची : पेनल्टी कीक, मैदानी गोल आणि फ्रीकीक अशी अष्टपैलू हॅटट्रिक करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने व्यावसाईक क्लबमधील आपल्याच सहकाऱ्यांचा स्पेनविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली त्यामुळे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सुरुवातीलाच हायव्होल्टेज ठरलेला पोर्तुगाल स्पेन सामना 3-3 बरोबरीत सुटला.

रोनाल्डोला विश्वकरंडक स्पर्धेत अजून पर्यंत स्पेनविरुद्ध एकही गोल करता आलेला नव्हता पण आज तीन गोल करून भरपाई केली.  चौथ्याच मिनिटाला स्पेनच्या गोलक्षेत्रात रेयाल माद्रिदचाच सहकारी नॅचोने रोनाल्डोला अवैधपणे पाडले आणि रेफ्रींनी क्षणाचाही विलंब न लावता पेनल्टी दिली. रोनाल्डोनेच ही पेनल्टी घेत पहिला गोल केला. 

रोनाल्डोप्रमाणे स्पेनचा स्ट्रायकर असलेल्या दिएगो कॉस्टाने पोर्तुगालच्या चार खेळाडूंना चकवून 24 व्या मिनिटाला केलेला गोल स्पेनच्या आव्हानात आत्मविश्वास वाढवणारा ठरला. त्यानंतर स्पेनची दोन आक्रमणे थोडक्यात फसली. 

सामन्याची रंगत उत्तरोत्तर वाढत होती. चेंडूवर अधिक काळ ताबा स्पेनचा होता, परंतु मध्यांतराला एक मिनिट शिल्लक असताना रोनाल्डोने पुन्हा संधी साधली यावेळीही स्पेनचा गोरलक्षक जी हेआ गोलरक्षणात पुन्हा कमजोर ठरला.

टीकी टाका या तंत्राने खेळणाऱ्या स्पेनने उत्तरार्धात तीन मिनिटात गोल केले. यातील पहिला गोल कॉस्टाने केला. 55 मिनिटाच्या बरोबरीनंतर नॅचोने दूरवरून मारलेली कीक स्पेनला 3-2 आघाडीवर नेणारी ठरली.

स्पेन हा सामना जिंकणार असे वाटत असताना 88 व्या मिनिटाला पोर्तुगालला फ्री कीक मिळाली आणि त्यावर कमालीची एकाग्रता दाखवत रोनाल्डोने केलेला गोल जबरदस्त होता.

संबंधित बातम्या

Saam TV Live