ATM बाहेर पुन्हा लागणार रांगा ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

- देशातले 50 टक्के एटीएम बंद पडणार

- पुन्हा बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लागणार

- एटीएममधून पुन्हा कॅशिअरसमोर रांग

महाराष्ट्रातल्या प्रत्येक खातेदारासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. तुमच्या घराजवळचं एटीएम बंद पडण्याची शक्यता आहे. पैसे काढण्यासाठी तुम्हाला या एटीएममधून त्या एटीएमपर्यंत फेऱ्या माराव्या लागणार आहेत. कारण देशातली पन्नास टक्के एटीएम बंद पडण्याची शक्यता आहे.

नव्या नोटांमुळे एटीएममधील कॅश ट्रे बदलावे लागणार आहेत. देशातले 2 लाख 38 हजार एटीएममध्ये हे बदल करावे लागणार आहेत. एक एटीएममधील बदलाला 2 ते अडीच लाखांचा खर्च लागणार आहे. हा खर्च करण्यावरून बँका आणि एटीएम सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद आहे. या वादामुळे 1 लाख 13 हजार एटीएम बंद पडण्याची शक्यता आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live