#MarathaReservation | मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा आज अंतिम फैसला

साम टीव्ही
बुधवार, 15 जुलै 2020

वैद्यकीय प्रवेशातल्या मराठा आरक्षणावर, सुप्रीम कोर्ट आज अंतरिम आदेश देणार आहे. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरींत 13 टक्के आरक्षण आहे. 

वैद्यकीय प्रवेशातल्या मराठा आरक्षणावर, सुप्रीम कोर्ट आज अंतरिम आदेश देणार आहे. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरींत 13 टक्के आरक्षण आहे. या आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असल्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केलीय.

पाहा व्हिडीओ -

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण लागू करू नये, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची शेवटची तारीख 30 जुलै 2020 आहे. त्यामुळे यासंबंधीच्या सुनावणीचं महत्त्वं वाढलंय. सध्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र आरोग्य संकट गडद झाल्यानं, सुप्रीम कोर्टातली सुनावणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतंय. महाराष्ट्र सरकारने हा खटला लढवण्यासाठी आधी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केलेली आहे. त्यांच्यासोबतच आता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मराठा आरक्षणाची बाजू मांडणार आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live