मुंबई: परळमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत गुदमरून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबईच्या परळमधील क्रिस्टल टॉवरला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. टॉवरच्या 8 ते 12 व्या मजल्याला ही आग लागल्याचं समजतंय.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. अनेकांना या टॉवर मधून सुखरूप बाहेर काढण्यातही अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. टॉवरमधून धुराचे मोठे लोट निघत होते, त्यामुळे अनेकांना मोठा त्रासही झाला. 

आगीनंतर एकूण 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील चौघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झालाय, तर इतर 12  लोकांवर उपचार सुरु आहेत.      

WebTitle : marathi news fire at crystal tower parel mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live