BIG BREAKING | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, मुंबईत कोरोनामुळे एकाचा मृत्यू

BIG BREAKING | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, मुंबईत कोरोनामुळे एकाचा मृत्यू

राज्यातील कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मुंबईतील वृद्धाचा मृत्यू झालाय. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते.

पण आज सकाळी त्यांचं निधन झालं. ही व्यकी घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईहून परतल्यानंतर करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.

मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं. महत्त्वाचं म्हणजे या रुग्णाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचं संशय व्यक्त करण्यात आलाय. तिचीही चाचणी सध्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून कऱण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारी बाळगण्यात येतेय.   देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.

Web Title - marathi news  First death of corona in Maharashtra, death of one due to corona in Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर साम टीव्हीला फॉलो करा. त्याच सोबत यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com