मुलांनो, खेळा अन्‌ शिका; पहिलीला यंदापासून चार विषय

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

लातूर : चिमुकल्या मुलांना सतत खेळावेसे वाटते. नवनवीन गोष्टी शिकाव्या वाटतात. वेगवेगळ्या वस्तू स्वत: तयार कराव्याशा वाटतात. मुलांमधील हे गुण हेरून ‘खेळू, करू, शिकू’ हा नवा विषय यंदापासून इयत्ता पहिलीसाठी सुरू करण्यात अाला आहे. हे पुस्तक म्हणजे कलाशिक्षण, कार्यानूभव आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या तीन विषयांचा सुदंर गोफच आहे. तो मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच अनुभवायला मिळणार आहे.

शाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहीले अाहेत. त्यामुळे घराघरांत मुलांबरोबरच पालकांचीही धावपळ सुरू झाली आहे. बाजारात पुस्तकांसाठी गर्दीही होऊ लागली आहे. दुसरी ते आठवीची पुस्तके आठवडाभरापूर्वीच बाजारात दाखल झाली होती. तर पहिलीची पुस्तके आजपासून  उपलब्ध झाली आहेेत. दरवर्षी पहिलीला ‘बालभारती’, ‘माय इंग्लिश बुक’ आणि ‘गणित’ हे तीनच विषय असतात. यंदा पहिलीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून या तीन विषयांबरोबरच ‘खेळू, करू, शिकू’ हा चौथा विषय पहिलीसाठी सुरू करण्यात अाला आहे. ही पुस्तके सध्या बाजारात पाहायला मिळत आहेत.
   
पुस्तकाचे ‘खेळू, करू, शिकू’ हे नाव आपुलकी दर्शविणारे आहे, असे ‘बालभारती’ने स्पष्ट केले आहे. कलाशिक्षण, कार्यानूभव आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण हे तीन विषय शिक्षणातच नव्हे तर जीवनभर अापल्या सोबत असतात. म्हणून अशा पद्धतीचे रंजक पुस्तक तयार करण्यात अाले अाहे. वेगवेगळे खेळ कसे खेळावेत, गाणी कशी म्हणावीत, वाद्य कसे वाजवावेत, चित्र काढून ती कशी रंगवावीत, कागदाचा पंखा कसा तयार करावा, भेटकार्ड कसे बनवावे... अशा अनेक बाबी चित्रांसह पुस्तकातून सांगण्यात अाल्या आहेत. हे पुस्तक ८८ पानांचे असून यात मुलांची मने रमावीत म्हणून विविध रंगामधील असंख्य चित्र वापरण्यात आली अाहेत.

पुस्तकांसाठी रात्रंदिवस धावपळ
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके मिळावीत यासाठी लातूर विभागातील ‘बालभारती’च्या भांडारात रात्रंदिवस धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत अाहे. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रजा तर काहींनी सुट्या रद्द केल्या आहेत. प्रभारी भांडार व्यवस्थापक विश्‍वनाथ जाधव, भांडार अधिक्षक एन. पी. पडोळ, भांडार अधिक्षक डी. व्ही. पवार यांच्या नियाेजनानूसार लातूर विभागातील सर्व जिल्ह्यात पुस्तकांचा साठा पुरवला जात आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live