(VIDEO) पंगा नाय तर दंगा नाय... माऊलीचा पहिला टीझर !!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. लय भारी या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवाद आहेत.

'आपलं नाव ऐकलं नाय, असं एक बी गाव नाय अन् हाणल्या बगैर सोडलं तर माऊली आपलं नाव नाही,' या संवादाने रितेशची एण्ट्री दाखवण्यात आली आहे. 14 डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'हिंदुस्तान टॉकीज'च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे.

या चित्रपटात रितेश एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मीती रितेश देशमुखची पत्नी जिनिलीया देशमुख यांची आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live