अखेर आमदारांची फाईव्ह स्टार कैदेतून सुटका होणार...

मोहिनी सोनार
रविवार, 1 डिसेंबर 2019

मुंबई : बातमी आहे महाविकासआघाडीच्या आमदारांना दिलासा देणारी. अनेक दिवसांपासून आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार होती. बहुमत सादर करण्यासाठी आणि घोडेबाजार होणार नाही यासाठी आमदारांना चांगलीच कसरत करावी लागलीय. या आमदारांनी आपली परिक्षा उत्तम पास केल्यानं त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे.  आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडतेय. या निवडणुकीनंतर बहुमतासाठी वेठीस धरले गेलेल्या आमदारांची फाईव्ह स्टार कैदेतून सुटका होणार आहे.

मुंबई : बातमी आहे महाविकासआघाडीच्या आमदारांना दिलासा देणारी. अनेक दिवसांपासून आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार होती. बहुमत सादर करण्यासाठी आणि घोडेबाजार होणार नाही यासाठी आमदारांना चांगलीच कसरत करावी लागलीय. या आमदारांनी आपली परिक्षा उत्तम पास केल्यानं त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे.  आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडतेय. या निवडणुकीनंतर बहुमतासाठी वेठीस धरले गेलेल्या आमदारांची फाईव्ह स्टार कैदेतून सुटका होणार आहे. फोडाफोडीच्या भीतीमुळे हॉटेलमध्ये मुक्कामास असलेले आमदार, आज आपापल्या घरी जाऊ शकणार आहेत. सत्तास्थापनेसाठी भाजपकडून सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना फितवलं जाऊ नये. म्हणून त्यांना हॉटेलमध्ये हलवण्यात आलं होतं. बहुमत चाचणीनंतरच या आमदारांना घरी जाण्याचे वेध लागले होते. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी त्यांना थांबवण्यात आलं.

आता मात्र उद्यापासून ते अपापल्या घरी जाण्यासाठी मोकळे आहेत. एक वेळ तर आमदारांवर अशीही आली होती की, त्यांना लपवूनही ठेवण्यात आलं. मात्र या सगळ्यामधून हे आमदार आता सुखरुप सुटले आहेत. त्यामुळे आता ते घरी जातील. बहुमत चाचणीनंतरच या आमदारांना घरी जाता येईल.

Web Title - Five MLAs released from prison


संबंधित बातम्या

Saam TV Live