Vodafone-Idea घेणार मोठा निर्णय; 1 जीबी डाटासाठी...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : Vodafone-Idea कंपनी बंद होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या Vodafone-Idea कडे कोट्यवधींची थकबाकी आहे. त्यामुळे आता ही रक्कम भरण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे. 

नवी दिल्ली : Vodafone-Idea कंपनी बंद होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या Vodafone-Idea कडे कोट्यवधींची थकबाकी आहे. त्यामुळे आता ही रक्कम भरण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे. 

टेलिकॉम विभागाकडून कंपनीसंदर्भात काही आदेश देण्यात आले आहेत. या आदेशावरून Vodafone-Idea कंपनीने चिंता व्यक्त केली आहे. टेलिकम्युनिकेशन विभागाच्या निर्णयानंतर भारतात दोनच दूरसंचार कंपन्या उरतील, असा अंदाज लावण्यात येत आहे. भारतात सध्या Vodafone-Idea, एअरटेल आणि जिओ या कंपन्या आहेत. या तिघांमध्ये मोठी चढाओढ आहे. 

याशिवाय Vodafone-Idea चे चेअरमन कुमार मंगल बिर्ला यांनीही दूरसंचार कंपन्या बंद होतील, अशी भीती व्यक्त केली होती. 

एक जीबी डाटासाठी...

आर्थिक संकटात सापडलेली Vodafone-Idea कंपनी इंटरनेटच्या दरात वाढ करण्याच्या विचारात आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यानुसार एक जीबी डाटासाठी 35 रुपये आकारण्यात यावे, असा विचार आहे.

कॉलच्या किमतीही वाढणार

इंटरनेटच्या दरवाढीनंतर 6 पैसे/मिनिट कॉल दर आकारला जावा, असेही सांगितले जात आहे. तर 28 दिवसांसाठी 50 रुपये किमान कनेक्टिंग चार्ज म्हणून आकारला जावा, असे सांगण्यात आले आहे. 

एक एप्रिलपासून दरवाढ लागू

कंपनीकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी ही दरवाढ लागू केली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार येत्या एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले जात आहे.

Web Title  Fix Rs 35 Per GB As Minimum Price For Data Vodafone Idea


संबंधित बातम्या

Saam TV Live