Online Food Delivery कंपन्यांना अन्न व सुरक्षा विभागातर्फे नोटीस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

सातपूर - ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच पोचविण्याची सेवा देणाऱ्या उबर, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांना अन्न व सुरक्षा विभागातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अन्न हाताळण्याचा परवाना सात दिवसांत घ्यावा; अन्यथा अन्न व सुरक्षा विभागतर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे व सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांनी सांगितले. 

सातपूर - ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच पोचविण्याची सेवा देणाऱ्या उबर, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांना अन्न व सुरक्षा विभागातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अन्न हाताळण्याचा परवाना सात दिवसांत घ्यावा; अन्यथा अन्न व सुरक्षा विभागतर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे व सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांनी सांगितले. 

काही महिन्यांपासून ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच मागवण्याची सेवा देणाऱ्या उबर, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांनी नाशिककरांना भुरळ घातली आहे. पण अनेकांना सेवा वेळेवर मिळत नाही, तसेच दिलेल्या ऑर्डरपेक्षा कमी प्रमाण देणे यांसह विविध प्रकारच्या तक्रारी आल्याचे उदाहरण आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. सध्या उबर इट्‌सकडे दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी, तर झोमॅटो व स्विगीमध्ये साधारण चारशे ते पाचशे डिलिव्हरी बॉय कर्मचारी आहेत. 

या सर्व बाबींचा विचार करता अन्न व सुरक्षा विभागातर्फे सात दिवसांत प्रत्येक कर्मचाऱ्याने सुरक्षित अन्न हाताळण्याचा परवाना न घेतल्यास कंपन्यांचे परवाना रद्द करण्यात येणार असल्याची नोटीस दिली आहे. या नोटिशीनंतर शहरातील विविध ऑनलाइन सुविधा देणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी परवाना व नोंदणी घेतली नाही, तर त्यानांही पे रोलवर घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून या कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला जात होता. पण अन्न व सुरक्षा विभागातर्फे सुरू केलेल्या कारवाईमुळे काही कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच नाशिककरांना सुरक्षित अन्न मिळावे, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

संदीप हॉटेलचा परवाना दहा दिवस रद्द 
शहरातील अतिशय अलिशान संदीप हॉटेलमध्ये अचानक तपासणी मोहिमेत किचनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता व झुरळ आढळले. त्यामुळे या हॉटेलचा परवाना दहा दिवस रद्द करण्यात आला आहे. यात सुधारणा न झाल्यास कायमचाच परवाना रद्द करण्यात येईल, अशी नोटीस बजावणार आहे. 

 

WebTitle : marathi news food and security department issued notice to online food delivery brands  


संबंधित बातम्या

Saam TV Live