वास्तूशांतीच्या पुजेतील जेवणातून 80 हून अधिकांना विषबाधा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

महड : रायगडमधील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथे वास्तूशांतीच्या पुजेतील जेवणातून 80 हून अधिकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पनवेलमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहे.

खालापूर तालुक्यातील महड येथील माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला. अनेकांना विषबाधा झाल्याची माहिती असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत 3 लहान मुलांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live