राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 मार्च 2020

पुणे : वाढलेले कमाल तापमान, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात झालेली वाढ, यामुळे राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २) राज्यात हवामान ढगाळ राहण्याचा व तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : वाढलेले कमाल तापमान, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात झालेली वाढ, यामुळे राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २) राज्यात हवामान ढगाळ राहण्याचा व तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये असलेल्या दोन चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीदरम्यान असलेला हवेचा कमी दाबचा पट्टा यामुळे राज्यात वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होत आहे. नाशिक, औरंगाबाद, जालना, सोलापूरसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शनिवारी रात्री वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. रविवारी दुपारनंतर राज्यात ढग जमा झाले होते. 

राज्यात किमान तापमानवाढ झाल्याने थंडी नाहीसी झाली असून, रविवारी (ता. १) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

रविवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.८(१७.०), नगर ३५.२, धुळे ३५.४ (१५.०), जळगाव ३५.९(१६.६), कोल्हापूर ३३.१(२२.०), महाबळेश्‍वर २९.०(१७.०), मालेगाव ३६.६ (१७.४), नाशिक ३३.५(१५.६), निफाड ३१.०(१३.२), सांगली ३४.७(२०.६), सातारा ३३.८(१९.८), सोलापूर ३४.५(१९.९), डहाणू ३१.१ (१९.६), सांताक्रूझ ३२.७(२०.२), रत्नागिरी ३२.५(२०.४), औरंगाबाद ३५.२(१७.७), परभणी ३५.३(२०.५), नांदेड ३४.०(१४.५), अकोला ३०.०(१९.०), अमरावती ३४.४(१८.८), बुलडाणा ३३.२(१९.२), चंद्रपूर ३३.५(१६.०), गोंदिया ३१.०(१६.८), नागपूर ३३.९(१५.६), वर्धा ३३.०(१६.०), यवतमाळ ३३.५(१९.०). 

​web title : marathi news forecast of cloudy climate  in state


संबंधित बातम्या

Saam TV Live