आनंद सोडा, आता विधानसभेच्या कामाला लागाः मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला तरी आता कार्यकर्त्यांनी त्या मानसिकतेतून बाहेर पडावे. युद्ध हे युद्धासारखेच लढायचे असते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करा, कार्यकर्त्यांशी संवाद साधा. बूथस्तरीय यंत्रणा सक्रिय करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ते नागपुरात आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाचा मंत्र सांगितला आहे. कुठल्याही विजयाचा आनंद हा एक दिवस असतो. त्यानंतर पुढच्या निवडणुकीची तयारी करायची असते. त्यामुळे आता लोकसभेच्या विजयाच्या मानसिकतेतून बाहेर पडून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. कार्यकर्त्यांशी संवाद साधा.  त्यासाठी आता मतदार नोंदणीवर भर दिला गेला पाहिजे. स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून रोजच्या रोज मतदार नोंदणीच्या अर्जांचा आढावा घ्या,' असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी राहायला तयार नाही, सोनियाही हे पद स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांना तिसरा माणूस सापडत नाही. आता विरोधक उरलेलेच नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना तुमच्यात घ्या,' असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला नाशिक येथे दिला होता.

Web Title: forgot lok sabha election victory and be prepared for vidhansabha election says cm devendra fadnavis

संबंधित बातम्या

Saam TV Live