माजी केंद्रीय मंत्री बँ. ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांचा आज शिवसेनेत प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 मार्च 2019

महाड: राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बँ. ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. गेले काही दिवसांपासून नाविद हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसंग्रामचे रायगड अध्यक्ष अँड. उद्य आंबोणकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही प्रवेशामुळे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना नव्या आव्हानाना सामोरे जावे लागणार आहे.

बॅ. अंतुले यांना मानणारा मोठा वर्ग आजही कोकणात आहे. कोकणचे भाग्यविधाते अशी ओळख असलेल्या बँ. अंतुले यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले सुनील तटकरे अंतुले यांची साथ सोडून शरद पवारांसोबत रा. काँ पक्षात गेल्याने रायगडच्या राजकारणात तटकरे-अंतुले वाद कायम राहिला. आपल्या व्यवसायातून आता राजकारणात उडी मारलेले बँ. अंतुले यांचे पुत्र नाविद यांनी तटकरे यांचा प्रचार करण्यास स्पष्ट नकार देत शिवसेनेत प्रवेश केला.

श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात खास करुन अंतुले यांचा वरचष्मा असल्यांने नाविद यांना याचा फायदा घेता येणार आहे. नाविद यांच्या प्रवेशामागे शिवसेनेचे मंत्री अनंत गीते यांचे मोठे योगदान आहे. मागील विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलेले अँड. उदय आंबोणकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. नाविद यांनी अंतुले समर्थकांच्या भेटीगाठीही सुरु केल्या आहेत.

Web Title: Naveed Antule Enters in Shivsena

संबंधित बातम्या

Saam TV Live