तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 एप्रिल 2019

कोलकता: पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी लढाई असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपलाच विजय मिळेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पश्चिम बंगालमधल्या सेरामपूरमधल्या सभेमध्ये मोदींनी हा दावा केला आहे. 23 मेच्या निकालाच्या दिवशी तुम्हाला सगळीकडे भाजपच दिसेल, असंही ते म्हणाले. सोबतच 40 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील असे संकेत दिले आहेत.

'तुमचे आमदार आमच्या कायम संपर्कात आहेत. तुम्हाला सोडून हे आमदार आमच्याकडे येतील', असा इशाराच त्यांनी ममता बॅनर्जींना दिला. तुम्ही तुमच्या लोकांचा विश्वासघात केल्यामुळे त्यांना आमच्यासोबत यायचं आहे. त्यामुळे आता ममतादीदी तुमच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत, असं नरेंद्र मोदी जाहीर सभेत म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्यामुळे तृणमूल काँग्रेसच गोटात खळबळ उडाली आहे.

Web Title: marathi news forty MLAs of trinamool congress are in my connection says PM Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live