आजपासून पुढचे 4 दिवस इगतपुरीजवळ मेगाब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथे सुरू असलेल्या रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी सोमवारपर्यंत ब्लॉक घेण्यात येणारे. यामुळे लांब रेल्वे पल्ल्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथे सुरू असलेल्या रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी सोमवारपर्यंत ब्लॉक घेण्यात येणारे. यामुळे लांब रेल्वे पल्ल्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

आजपासून २२ ऑक्टोबरपर्यंत हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे कुर्ला मनमाड एक्स्प्रेस, आणि  मुंबई भुसावळ पॅसेंजर या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

काय आहेत गाड्या आणि वेळापत्रकात बदल :

१९ ऑक्टोबर- रद्द होणाऱ्या गाड्या 

 • गाडी क्र. १२११७/१२११८ एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस.
 • गाडी क्र. ५११५३/५११५४ मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर.
 • गाडी क्र. ११०५५ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस स. १०.५५ ऐवजी दु. १ वाजता सुटेल.
 • गाडी क्र. १२५४२ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस स. ११.१० ऐवजी दु. १.२० वा. सुटेल.
 • गाडी क्र. ८२३५६ सीएसएमटी-पाटणा सुविधा एक्स्प्रेस स. ११.०५ ऐवजी दु. १.३० वा. सुटेल.
 • गाडी क्र. ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे धावेल.
 • गाडी क्र. ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व्हाया दौंड-मनमाड.
 • गाडी क्र. ११०८३ एलटीटी-काझिपेत एक्स्प्रेस कारडीहून दु. १.३० ते दु. ३.१०हून सुटेल.
 • गाडी क्र. १३२०१ राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेसला ठाण्यात अंतिम थांबा आहे.
 •  

२० ऑक्टोबर- रद्द होणाऱ्या गाड्या 

 • गाडी क्र. १२११७/१२११८ एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस.
 • गाडी क्र. ५११५३/५११५४ मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर.
 • गाडी क्र. १२०७१ दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दु. २ ऐवजी दु. २.५० वा. सुटेल.
 • गाडी क्र. ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे धावेल.
 • गाडी क्र. ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व्हाया दौंड-मनमाड.
 • गाडी क्र. १३२०१ राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेसला ठाण्यास अंतिम थांबा.
 • गाडी क्र. ११०५९ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस
 • गाडी क्र. १२५४२ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, गाडी क्र. ११०६१ एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस 
 • गाडी क्र. ११०७१ एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस
 • गाडी क्र. १२१८८ सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस 
 • गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम-हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस लक्षद्वीप एक्स्प्रेस 
 • गाडी क्र. २२८८५ एलटीटी-टाटानगर अंत्योदय एक्स्प्रेस सुमारे एक तास ते पावणे दोन तास उशिरा 

२१ ऑक्टोबर- रद्द होणाऱ्या गाड्या 

 • गाडी क्र. १२११७/१२११८ एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस.
 • गाडी क्र. ५११५३/५११५४ मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर.
 • गाडी क्र. ११०२५ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस स. १०.५५ ऐवजी दु. १ वाजता सुटेल.
 • गाडी क्र. ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व्हाया दौंड-मनमाड
 • गाडी क्र. १२१४२ पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्र. १२२९४ अलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस, गाडी क्र. ११०६० छापरा-एलटीटी एक्स्प्रेस
 • गाडी क्र. ११०८० गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस
 • गाडी क्र. १५०१८ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस व्हाया अलाहाबाद भुसावळ येथून वळवण्यात येतील. या दिवशीही गाड्या उशिरा धावतील. 

WebTitle : four days megablock in igatpuri for route relay interlocking and remodelling 

संबंधित बातम्या

Saam TV Live