आसाममध्ये बॉम्बस्फोट; चौघेजण जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

आसामच्या गुवाहटी येथील शुक्लेश्वर घाटात बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 4 जण जखमी झाले असून, या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणाचा तपास केला जात आहे.

याबाबत येथील पोलिस आयुक्त दिगांता बोरा यांनी सांगितले, की ''आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटानंतर कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बॉम्बशोधक-नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे''.

दरम्यान, शुक्लेश्वर येथे झालेल्या या बॉम्बस्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live