VIDEO | धक्कादायक! मित्रांकडूनच तरूणाचं गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 मार्च 2020

 नवी मुंबईतल्या दिघा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका तरुणाचं गुप्तांग जाळण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय. जखमी झालेल्या या तरुणाला वाशीतल्या मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

नवी मुंबई - मुंबई नागपूर पाठोपाठ नवी मुंबईत देखील गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतंय. दरोडा, खून, चोऱ्यामाऱ्या यासारख्या घटना दिवसेंदिवस समोर येतायत. अशीच एक धक्कादायक आणि घृणास्पद घटना नवी मुंबईतील दिघा भागातून समोर आलीये. याबाबतचा व्हिडीओ WhatsApp च्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आलीये. यामधून मानवी विकृतीने कोणती पातळी गाठलीय याची कल्पना येईल. 

मोठी बातमी - 

घटना आहे घुलिवंदनाच्या दिवशीची. धुलीवंदनाच्या दिवशी तो पूर्णतः दारूच्या नशेत तऱ्हाट होता. आपल्यासोबत काय घडतंय याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. दारूच्या नशेत असतानाच एकाचे या इसमाचं गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न केला. विकृतीचा कळस म्हणजे ज्यांनी हा थिल्लर आणि भयंकर प्रकार केला ते या घटनेचा व्हिडीओ देखील शूट करत होते. मोबाईल कॅमेऱ्यात हा व्हिडीओ शूट करून हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व मंडळी या पीडित तरुणाची मित्रमंडळी आहेत. 

मोठी बातमी - 

धुळवडीच्या दिवशी पीडित तरुण आपल्या मित्रांकडे धुळवड साजरी करायला गेलेला. मित्रांकडे त्यांनी सर्वांनी दारू प्यायली. दारू जास्त झाल्याने या तरुणाला तिथेच झोप लागली. दारूच्या नशेत भान हरपल्याने झोपेतच त्याने लघुशंका देखील केली. याचाच मित्रांना प्रचंड राग आला. म्हणून त्यांनी या मित्राची पॅन्ट खाली करून त्याचं गुप्तांग जाळण्याचा प्रयन्त केलाय. सदर घटना याच तरुणाच्या मित्रांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड देखील केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली. दुसऱ्या दिवशी दारूची नशा उतरल्यानंतर या तरुणाला सर्व प्रकार समाजाला. सर्व प्रकार समजताच त्यांनी तडक रबाळे MIDC पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे घडलेला सर्व प्रकार सांगितला.  

मोठी बातमी - 

मिळालेल्या माहितीनुसार सध्या या पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या धक्कादायक घटनेबाबत रबाळे MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण कृत्यानंतर आकाश काळे आणि नितेश खारकर या पीडित तरुणाच्या मित्रांना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  

Web Title: friends torchered private part by his friends while the all were sloshed on holi


संबंधित बातम्या

Saam TV Live