आता पेट्रोल डिझेलसाठी मिळवा लोन..  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 मे 2018

जमाना ईएमआय़चा आहे. नोकरदार तर अनेक संसारउपयोगी वस्तू हप्त्य़ानंच खरेदी करत असतात. आता इंधन दरवाढ झाल्यानं एका फायनान्स कंपनीनं इंधनावर कर्ज देण्याची योजना सुरू केलीय. या कंपनीनं सामान्यांना कर्ज देण्याची योजना सुरू केलीय. श्रीराम फाय़नान्स कंपनीनं ही योजना आणलीय. कर्ज घेण्यासाठी घरी वाहन असण्याची अट आहे. हे कर्ज हप्त्याहप्त्यानं फेडता येणार आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट आणि हिंदूस्तान पेट्रोलियममध्ये यासंदर्भात करार झालाय. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर ग्राहकांना पेट्रोल-डिझेलसाठी कर्ज मिळणार आहे. हे कर्ज १५ ते ३० दिवसांमध्ये फेडावे लागणार आहे.

जमाना ईएमआय़चा आहे. नोकरदार तर अनेक संसारउपयोगी वस्तू हप्त्य़ानंच खरेदी करत असतात. आता इंधन दरवाढ झाल्यानं एका फायनान्स कंपनीनं इंधनावर कर्ज देण्याची योजना सुरू केलीय. या कंपनीनं सामान्यांना कर्ज देण्याची योजना सुरू केलीय. श्रीराम फाय़नान्स कंपनीनं ही योजना आणलीय. कर्ज घेण्यासाठी घरी वाहन असण्याची अट आहे. हे कर्ज हप्त्याहप्त्यानं फेडता येणार आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट आणि हिंदूस्तान पेट्रोलियममध्ये यासंदर्भात करार झालाय. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर ग्राहकांना पेट्रोल-डिझेलसाठी कर्ज मिळणार आहे. हे कर्ज १५ ते ३० दिवसांमध्ये फेडावे लागणार आहे. या कर्जासाठी किती व्याज आकारण्यात येईल हे कंपनीनं स्पष्ट केलेलं नसलं तरी कर्जावरील व्याज कमी असेल असं सांगण्यात येत आहे. 

 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live