एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा इंधन दरवाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

बातमी आहे रोज सातत्यानं होणाऱ्या इंधन दरवाढीची. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 14 पैसे तर डिझेल 21 पैशांनी महागले आहे. या दरवाढीमुळे डिझेलने 80चा टप्पा पार केला आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर 91.34 रुपयांवर पोहोचला आहे तर डिझेलसाठी मुंबईकरांना आज 80.10 रुपये मोजावे लागतील.

राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने ही दरवाढ सुरु आहे. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दररोज कच्चा तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

WebTitle : marathi news fuel price hike continues in india diesel crosses mark of 80 

संबंधित बातम्या

Saam TV Live