पेट्रोल प्रतिलिटर 24 पैसे तर डिझेल 32 पैशांनी महागलं ; CNG सह घरगुती गॅसही महागला

पेट्रोल प्रतिलिटर 24 पैसे तर डिझेल 32 पैशांनी महागलं ; CNG सह घरगुती गॅसही महागला

आज पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 24 पैसे तर डिझेल 32 पैशांनी महागले आहे. त्यामुळे, आज मुंबईत पेट्रोलचा दर 91.08 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलसाठी मुंबईकरांना आज 79.72 रुपये मोजावे लागतील. 

राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत. आतापर्यंत फक्त 29 मे ते 5 जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर 6 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे. 

CNG सह घरगुती गॅसही महागला

पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना आता CNG सह घरगुती गॅसही महागलाय. केंद्र सरकारने विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 59 रुपयांची वाढ केलीय. तर अनुदानित सिलिंडरमध्ये 2 रुपये 89 पैशांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळे सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार आहेत. रुपयाचे अवमुल्यन आणि आंतराष्ट्रीय बाजारात तेलाचे वाढत चाललेले भाव इंधनाच्या दरांवर परिणाम करत असून सर्वसामान्यांचे  कंबरडं मोडलंय.

WebTitle : marathi news fuel price hike in india continues increase in CNG LPG price hampers budget of common man  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com