आज पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 24 पैशांनी महागले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. मोदी सरकारने केलेल्या दर कपातीनंतर इंधनाच्या दरात रोजच वाढ होताना दिसत आहे. आज पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 24 पैशांनी महागले आहे.

मुंबईत आज प्रतिलिटर पेट्रोलचा दर 88.29 रुपये तर डिझेलसाठी वाहनधारकांना 79.35 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीचा भडका आणि महागाईच्या चटक्यांमुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची, ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या 11 दिवसात पेट्रोल 1 रुपया 32 पैशांनी भडकलेत तर, डिझेलच्या दरात 2 रुपये 61 पैशांची वाढ झाली आहे. ऐन सणासुदीत वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांवर संक्रांत ओढवल्याचंच चित्र पाहायला मिळतंय.

WEB TITLE : MARATHI NEWS FUEL PRICE HIKE MAHARASHTRA PETROL DIESEL 

संबंधित बातम्या

Saam TV Live