आज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

इंधनाच्या दरांमध्ये सतत घट सुरू आहे. आज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त झालंय. त्यामुळे मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 84 रुपये 49 पैसे तर डिझेल 77 रुपये 06 पैसे प्रतिलिटर असे दर झालेत.

मागील 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसते आहे. पेट्रोलच्या किमती नव्वदी पार करतात की काय असं वाटत असताना डिझेलच्या किंमतीही 80 ते 81 रुपये प्रति लिटर झाल्यात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमध्ये कपातच बघायला  मिळतंय.

WebTitle : marathi news fuel price rates continues to drop 

संबंधित बातम्या

Saam TV Live