सलग तिसऱ्या आठवड्यात इंधन दरकपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी महागला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

सलग तिसऱ्या आठवड्यात देशभरात इंधन दरकपात सुरू आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 17 पैशांनी स्वस्त झालंय. त्यामुळे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 83.40 रुपये तर डिझेलसाठी 76 रुपये 5 पैसे मोजावे लागत आहेत. 

गेल्या 24 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल साडे चार रुपयांनी कमी झालेत.  दसऱ्यापासून सुरु झालेले इंधनाच्या दरकपातीचं सत्र सुरुच आहे. मागील 24 दिवासांत पेट्रोल 4 रुपये 81 पैसे तर डिझेल 3 रुपये 21 पैशांनी स्वस्त झालंय. सलग उतरणाऱ्या दरांमुळे राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी पेट्रोलचे दर 85 रुपये प्रति लीटरच्या खाली आलेत. 

अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला
अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला आहे. केंद्र सरकारने एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी ही दरवाढ केल्याचं कळतंय. या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत 505.05 रुपये झाली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live